This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात 162 चित्रपटांचा समावेश

 


मुंबई, 13-9-2017

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात नुकताच 162 चित्रपटांचा समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे यापैकी 125 पेक्षा जास्त चित्रपटांच्या मुळ / दुय्यम निगेटीव्ह उपलब्ध झाल्या आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या चित्रपटांमध्ये 44 कृष्णधवल चित्रपट आहेत, तर प्रदर्शित होऊ न शकलेले 15 चित्रपटही यात समाविष्ट आहेत. या संग्रहात बहुतांश हिंदी चित्रपटांचा समावेश असून, त्या व्यतिरिक्त 34 गुजराती, 15 मराठी, 6 भोजपुरी आणि काही नेपाळी चित्रपटांचाही समावेश आहे.

‘महात्मा’च्या मुळ निगेटीव्हचा यात समावेश असून, विठ्ठलभाई झवेरी यांच्याकडून प्राप्त झालेले 6 तास लांबीचे महात्मा गांधींजींचे चित्रीकरणही उपलब्ध झाले आहेत. झवेरी हे गांधीजींचे सहकारी छायाचित्रकार आणि चित्रपट निर्मातेही होते.

संग्रहालयाकडे उपलब्ध नसलेल्या काही चित्रपटांच्या प्रतीही या खजिन्याच्या रुपात उपलब्ध झाल्या आहेत. यात ‘फासला’(1976) आणि ‘अमर सिंग राठोड’ (1957) हे हिंदी चित्रपट, बी एस थापा यांचा माला सिन्हा अभिनीत आणि जयदेव यांनी संगीत दिलेला नेपाळी चित्रपट ‘मैती घर’ (1966) तसेच जयवंत पाठारे यांच्या ‘आलय तुफान दर्याला’ (1973) या मराठी चित्रपटाचा समावेश आहे.

या संग्रहातील इतर चित्रपटांमध्ये इजरा मीर यांच्या ‘सितारा’ (1939), मणी कौल यांच्या ‘उसकी रोटी’ (1969), के ए अब्बास यांच्या अमिताभ बच्चन अभिनीत ‘सात हिंदुस्तानी’ (1969), दिलीपकुमार अभिनीत ‘कोहिनुर’ (1960) , ‘कुँवारा बाप’ (1974), ‘पृथ्वीराज चौहान’ (1959), नर्गिस आणि राज कपूर अभिनीत ‘अंबर’ (1952) या हिंदी, ‘जीवी राबरन’ (1980) या गुजराती, ‘बन्या बापू’ (1977) या मराठी, तसेच ‘जिंदगी और तुफान’ या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. 1964 साली टोकियो इथे झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिकचे चित्रीकरण असणाऱ्या कोन इचिकावा यांच्या ‘टोकियो ऑलिम्पियाड’ (1965) या चित्रपटाचाही या संग्रहात समावेश आहे.

हा संपूर्ण संग्रह मुंबईतील फेमस सिने लॅबोरेटरी मधून प्राप्त झाल्याचे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी सांगितले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे ते म्हणाले. संग्रहालयातील बहुतांश चित्रपट मुळ / दुय्यम निगेटीव्ह स्वरुपात असल्यामुळे हा ठेवा अनमोल आहे. संग्रहालयात अशा प्रकारच्या चित्रपटांच्या प्रती संग्रहीत करुन चित्रपट उद्योगाने संग्रहालयावर विश्वास दाखवला आहे. देशातील चित्रपटांचा वारसा भावी पिढ्यांसाठी जपता यावा, यासाठी चित्रपट निर्मात्यांनी हा आदर्श बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.

 
PIB Release/MH/171
बीजी -माधुरी -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau